Eknath Shinde : Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : "धमकी दिली गेली, पण वरळीतून मी एकटाच.." शिंदेनी सांगितला बंडखोरीचा किस्सा!

Eknath Shinde : "एकनाथ शिंदे छोटी आव्हानं स्वीकारत नाही."

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे याच्या वरळीच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोळी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी शक्तिप्रदर्शन केल्याने राज्याच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, कोळी समाज हा जीवाला जीव देणारा आहे. समुद्रांच्या लाटांशी सामना करणारा कोळी समाज हा इथला मूळनिवासी आहे. मी कोळी नसलो तरी या व्यवसायाशी माझं जवळचं नातं आहे. मी मासेविक्रीचा व्यवसाय पूर्वी केलेला आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा देशाचे पंतप्रधान मुंबईत आले तेव्हा कोळी बंधू-भगिनींनी त्यांचं स्वागत केलं. मागे एकदा बराक ओबामा यांचंही कोळी बांधवांनी स्वागत केलं होतं. कोळी बांधवांची परंपरा आणि संस्कृती मोठी आहे, ते आपण जपलं पाहिजे.

कोळी बांधवांचा कोस्टल रोडला विरोध नव्हता. फक्त दोन पिलरमध्ये अंतर वाढवण्याची मागणी होती. पूर्वी ६० फूट अंतराने काम होणार होतं. परंतु बोटींना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे अंतर १२० फूट ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मागच्या सरकरला सामान्यांच्या प्रश्नांचं देणंघेणं नव्हतं म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आमचं सरकार जनतेच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार, असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे छोटी आव्हानं स्वीकारत नाही. थेट मोठीच आव्हानं स्वीकारतो. आम्ही गुवाहाटीला असतांना काही लोक म्हणाले होते, वरळीतून जावून तर दाखवा.

'पण हा एकनाथ शिंदे वरळीतून गेला तोही रस्त्याने एकटाच. आम्हाला बाळासाहेबांनी निर्भिडतेची शिकवण दिली आहे' असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT