Eknath Shinde, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News: आता शाखा उघडून काही उपयोग नाही; शिंदे गटाच्या नेत्याने राऊतांना डिवचलं

Mangesh Mahale

Kalyan: उद्धव ठाकरे पंधरा दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उद्या (ता.3) शाखांचे उद्घाटन व जाहीर सभेसाठी डोंबिवलीत येणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभेवर ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे . 'मतदार राजा हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये. तुझं एक मत 'हुकूमशाही' अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीत ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते.राऊतांच्या दौऱ्यावरून शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाला लक्ष केले आहे.

"जे कधी घरातून बाहेर निघाले नाहीत, लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, त्यांना आता समजतंय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही केली. ते आता सांगताहेत लोकशाही पद्धतीने मतदान करा. पण कितीही शाखा उघडल्या तरी लोकांना माहितीय कोण काम करतेय. आता शाखा उघडून काही उपयोग नाही," असा टोला शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

ठाकरे गटाने लावलेल्या बॅनर बाबत मोरे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्यांनी आयुष्यभर हुकुमशाही चालवली, ते आता लोकशाही पद्धतीने मतदान करा, असं सांगतात हे हास्यस्पद असल्याचा टोला मोरे यांनी लगावला. ठाकरे गटाने कितीही शाखा उघडल्या ,काहीही केलं तरी कोण काम करतं हे लोकांना माहीत आहे, असल्याची टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे तळागाळापर्यंत लोकांना भेटतात त्यांच्या समस्या सोडवत असल्याचे मोरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT