Eknath Shinde Latest News, Eknath Shinde Marathi News, Shivsena Latest Marathi News
Eknath Shinde Latest News, Eknath Shinde Marathi News, Shivsena Latest Marathi News  Sarkarnama
मुंबई

...हाच आमचा फोकस! उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याला जवळपास बारा तास उलटून गेल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिंदे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. पण त्यामध्ये त्यांनी कुठेही उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केलेला नाही. केवळ आपला फोकस यापुढे कशावर राहील, याबाबत सुतोवाच केले आहे. (Maharashtra political crisis)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 39 आमदारांनी बंड केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी बहुमत चाचणीचा आदेश दिला. त्यासाठी गुरूवारी सकाळी अकरा वाजता विशेष अधिवेशनही बोलावण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयातही दिलासा न मिळाल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी रात्री राजीनामा दिला.(Eknath Shinde Latest Marathi News)

त्यानंतर जवळपास बारा तासांनी एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,' असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना (shivsena) आमदारांच्या बंडखोरीने सुरू झालेले राजकीय नाट्य काल (बुधवारी) रात्री संपुष्टात आले. तब्बल साडेतीन तास सुनावणी झाल्यानंतर (30 जून) रोजी बहुमत चाचणी होईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने फ्लोअर टेस्ट घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आपल्याच लोकांकडून मिळालेल्या व्यथा मांडल्या आणि मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीने उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यास भाग पाडले. हे पक्षाच्या 56 वर्षांच्या इतिहासातील चौथे पण सर्वात मोठे बंड आहे. यापूर्वीच्या तिन्ही बंडखोरी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झाल्या होत्या. शिंदेच्या या बंडात मोठी 'रिस्क' घेणाऱ्यांपैकी कुणाला मंत्रीपदे मिळणार, त्यांच्या नावांची सध्या चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT