Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde यांचे कडक प्रत्युत्तर : आम्हीच खरे शिवसैनिक, कोणाला घाबरवताय?

सरकारनामा ब्यूरो

गुवाहटी : शिवसेनेने बारा बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर त्याला बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही तिखट उत्तर दिले आहे. हे बंडखोर आमदार पक्षाच्या बैठकीला उपस्थित नव्हते, असा दावा करत शिवसेनेने (Shivsena) पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवावे, असा अर्ज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आज रात्री उशिरा केला.

त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. या उत्तरात ते म्हणतात,`` कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

बारा आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT