NCP Sharadchandra Pawar Party Sarkarnama
मुंबई

Video Pipani Symbol Freeze: शरद पवारांना मोठा दिलासा; निवडणूक आयोगाचा निर्णय, 'पिपाणी' चिन्ह गोठवलं

Election Commission Decision Pipani Symbol Freeze: शरद पवारांना निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. 'पिपाणी'चिन्ह आयोगाने गोठवलं आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Mangesh Mahale

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या 'पिपाणी'चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. शरद पवार यांनी 'पिपाणी' या चिन्हावर आक्षेप घेतला होता.

त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने निकाल दिला असून 'पिपाणी'चिन्ह आयोगाने गोठवलं आहे. 'पिपाणी'चिन्ह गोठवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आलेल्या तुतारी चिन्हाला विरोधकांनी पिपाणी दाखवून चांगलेच आव्हान दिले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत तुतारीचा प्रभाव कमी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता विरोधकांची 'पिपाणी'वाजणे 'बंद' झाले आहे.

शरद पवार गटाची तुतारी आणि अपक्ष उमेदवारांची पिपाणी ही दोन्ही चिन्हे सामान्यतः 'तुतारी' म्हणून ओळखली जातात, असा उल्लेख पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता.

लोकसभा निवडणुकीत 'पिपाणी' या चिन्हामुळे आपलं नुकसान झाल्याचं शरद पवार गटाने म्हटलं होते. लोकसभेची निवडणूक पक्षाने 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर लढवली. मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना 'पिपाणी' चिन्ह देण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातील फरक न समजल्यामुळे शरद पवार गटाचा सातारा लोकसभेत पराभव झाला.

ग्रामीण भागात तुतारी व पिपाणी यात फरक कळला नाही. त्यामुळे बीड लोकसभेत पिपाणी चिन्हावरही भरभरुन मतदान झाल्याचे मतमोजणीच्या आकड्यांवरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारांपेक्षा पिपाणी चिन्हाला अधिक मते मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT