Emergency : केंद्रीय निडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे अधिकृत असलेले धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.
या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयानंतर थेट आणीबाणीच्या कालखंडाची आठवण झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खंत व्यक्त करीत आणीबाणीची आठवण करून दिली. तसेच केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त असूनही असा निर्णय कसा देऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सुळे म्हणाल्या, "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. आणीबाणीवेळी मी खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सूचत नाही", असे म्हणत त्यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगितले.
पुढे सुळे म्हणाल्या, "मला नेहमी विश्वास वाटत होता की, स्वायत्त असल्याने निवडणूक आयोग हे पारदर्शक काम करते. पण हा निर्णय कसा झाला? हेच कळत नाही. निवडणूक आयोगाकडे न्याय मागण्यासाठी आम्ही कमी पडलो की काय, असे वाटत आहे", अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पुढे सुळेंनी या निवडणूक आयोग्याच्या निकालाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, "शिवसेनेची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केली होती. बाळासाहेब हयात असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धवजी असतील. हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. राज ठाकरे (Raj thackeray) बाहेर पडले आणि स्वतःचा पक्ष काढला. या निर्णयामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.