Engineer caught taking bribe for power connection of agricultural pump
Engineer caught taking bribe for power connection of agricultural pump 
मुंबई

शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी लाच घेणारा अभियंता जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : शेती पंपासाठी agricultural pump नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी शेतकऱ्याला पाच हजारांची लाच (Bribe) मागणाऱ्या वीज कंपनीच्या (MSEB) कनिष्ठ अभियंत्याला (Junior Engineer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Curruption Branch) आज दुपारी सापळा रचून रंगेहात पकडले. राहुल सोनवले (वय 38, रा.एमएसईबी रस्ता, ओगलेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Engineer caught taking bribe for power connection of agricultural pump)

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाठार तेथील वीज कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन देणे सुरू आहे. त्याअंतर्गत वाठारच्या वीज कंपनीच्या कार्यालयात तेथील शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी एका शेतकऱ्याला नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी अभियंता सोनवले यांनी पाच हजारांची मागणी केली होती.

त्यानुसार ती रक्कम आज देतो, असे त्या शेतकऱ्याने सांगितले होते. त्यापूर्वी त्या शेतकऱ्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार श्री. ताटे, श्री. येवले यांनी वाठार येथे जाऊन  सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे संबधित शेतकऱ्याने लाचेची रक्कम सोनवले यांच्याकडे दिली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहाथ पकडले. त्यारकमेची पडताळणी करून सोनवलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कऱ्हाड तालुका पोलिसांत सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT