Narhari Zirwal Sarkarnama
मुंबई

Maharashtra Poltical Crisis: सत्तासंघर्षाचा निकाल येण्याआधी विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळांचं मोठं विधान; नोटीस देण्याचा निर्णय...

Supreme Court Hearing : "विधानसभा हे सार्वभौम सभागृह आहे. ते घटनेवर चालतं..."

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court Hearing On Shivsena MLA: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच उद्या (दि.11 मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायलाय देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्याचा निकाल अखेर उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोठं भाष्य केलं आहे. "मी दिलेला 16 आमदारांबाबतचा अपात्र करण्याचा निर्णय योग्यच आहे", असं एका वृत्तवाहीनीशी बोलताना ते म्हणाले.

यावेळी नरहरी झिरवाळ म्हणाले, "जो काही निर्णय मी दिलेला आहे, तो कुठला हेतू ठेवून दिलेला नाही. विधानसभा हे सार्वभौम सभागृह आहे. ते घटनेवर चालतं. त्यामुळे मी योग्य तोच निर्णय दिलेला आहे. न्यायदेवताही माझ्या निर्णयाचा विचार करेल. मी दिलेला निर्णय योग्य आहे", असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर निर्णय घेण्याची वेळ आली तर हा निर्णय विद्यमान विधानसभा अध्यक्षांकडे जाईल की, तुमच्याकडे येईल काय वाटतं? या प्रश्नाचे उत्तर देताना झिरवाळ म्हणाले, "निश्चतच तो निर्णय माझ्याकडे येईल. कारण मी तत्कालीन अध्यक्ष होतो. त्यामुळे तो निर्णय माझ्याकडे येईल.

मी आता अध्यक्ष नसलो तरी तेथीलच एका घटनात्मक पदावर आहे. त्यामुळे मी त्यावेळी जो निर्णय दिला तो कायद्याने दिलेला आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा प्रश्न येत नाही. जो निर्णय मी दिला तो निर्णय आत्ताही देण्याचा मला अधिकार आहे", असं ते यावेळी म्हाणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT