Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
मुंबई

फडणवीस तेल लावलेले पैलवान असल्याची सर्वांना जाणिव झाली : 20 जूनला करेक्ट कार्यक्रम करणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी काल मतदान व मतमोजणी झाली. यात सहावी जागा भाजपने जिंकत महाविकास आघाडीला धक्का दिला. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी "देवेंद्र फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. ते कोणाच्या हाताला सापडत नाहीत, याची सर्वांना जाणिव झाली आहे. 20 जूनला करेक्ट कार्यक्रम करणार," असा इशारा महाविकास आघाडीला दिला. ( Everyone realized that Fadnavis was an oiled wrestler: Correct program will be held on 20th )

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप ही जागा जिंकणार होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी आम्ही महाविकास आघाडीकडे खूप आग्रह धरला. तुम्ही हा हट्ट धरू नका. 24-25 वर्षे महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्हाला विधानपरिषदेची पाचवी जागा जिंकता येते तरीही आम्ही निवडणूक बिनविरोध उमेदवार देऊ तरी त्यांनी ऐकले नाही.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस असे रसायण आहे की, त्यांच्या डोक्यात काय चाललेले आहे. हे माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनाही कळणे अवघड. आम्हा सर्वांचा स्वभाव असा आहे की, त्यांच्यावरील इतका विश्वास की, ते सांगतील तेवढेच काम करायचे. त्यामुळे परफेक्ट डोक्यातील प्लानची अंमलबजावणी करून त्यांनी सहावी जागा जिंकून आणली. त्यांचे लक्ष्य होते की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यापेक्षा माझ्या उमेदवाराला जास्त मते मिळायला हवीत. शेवटी तसेच झाले. संजय राऊतांना सहाव्या क्रमांकावर जावे लागले.

महाविकास आघाडीकडून होत असलेल्या आरोपा बाबत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे. ते सत्तेचा दूरउपयोग करत आहेत. एका महिला अभिनेत्रीला, नारायण राणे यांच्या बाबत सत्तेचा दूरउपयोग करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर विश्वास असल्याचे ते एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे विधानपरिषदत गुप्त मतदान पद्धतीचा कायदा बदलता. नवाब मलिक 8 ते 9 महिन्यांपासून तुरूंगात आहेत. त्यांचा राजीनामा घेत नाहीत. त्यामुळे हा विजय रडीचा डाव नाही.

या विजयातून भाजपने सिध्द केले की, राज्यात सरकार नसूनही आम्ही कमी नाहीत. मागील दोन वर्षांत झालेल्या निवडणुकांत 6 विधान परिषदेपैकी चार, साडेसहा ग्रामपंचायती जिंकल्या. 31 नगरपंचायतींत आमचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आले तरी आम्ही कुठे कमी पडलो नाहीत. बऱ्याच जणांना अहंकार झाला आहे. याला उचला, त्याला अटक करा. त्यांना अद्दल घडविण्याची संधी आम्ही शोधत होतो. ती संधी आम्हाला या निवडणुकीतून मिळाली. आम्हाला आनंद आहे की, संजय राऊतांना सहाव्या क्रमांकावर जावे लागले.

उच्च न्यायालयात जाणार

खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेल्या सहा आमदारांची नावे असल्याचे सांगितले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ही त्यांची कार्यपद्धती चुकते आहे. सतत सुडाचे राजकारण. मी तीन पानी नोट देईल. यात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात सुरू केल्या लोकोउपयोगी योजना महाविकास आघाडीने कशा बंद केल्या याची माहिती असेल. ही कुठली कार्यपद्धती आहे. या निवडणुकीसाठी निधीची किती आमिषे दाखविली. विकासनिधी काय तुमचा घरचा आहे. उद्या उच्च न्यायालयात महाविकास आघाडीच्या आमदारांच्या विकासनिधी बाबत याचिका दाखल करू. आधी त्यांनी आमिष दाखविले मग म्हणतात घोडेबाजार करता, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

विधान परिषदेच्या सहा जागा जिंकणार

महाविकास आघाडीला फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण घेता येत नसेल तर आम्ही काय करणार. आम्ही विधान परिषदेतील सहाही जागा जिंकणार. हा आत्मविश्वास व गणित आहे. जर दाखून मतदान करायचे तिथे 11 मते जास्त आम्हाला मिळतात. इथे तर मतदान दाखवायचेच नाही. आम्हाला अनेकांनी हात दाखवून खूणवून सांगितले आहे. 300 टक्के असाच चमत्कार 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

संजय पवारांच्या पराभवाचे मला दुःख

संजय पवार यांना आम्ही हरवले नाही. तो माझ्या घरातील मुलगा आहे. त्याच्या पराभवामुळे मला दुःख झाले. शेवटी माझा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे माझ्या पक्षासाठी निर्णय घ्यावा लागला. मात्र संजय पवार यांच्यावर प्रेम भरपूर आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT