Sharad Pawar ON EVM News.jpg Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar : EVMचा घोळ? शरद पवारांची आक्रमक भूमिका; पक्षाच्या बैठकीत काय ठरलं?

Maharashtra Assembly Election Results 2024 Sharad Pawar ON EVM : व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी २८ तारखेपर्यंत तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

विधानसभेच्या मतमोजणीनंतर ईव्हीएमवर अनेकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमच्या मतावर महायुती जिंकून आली, असा आरोप विरोधक करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अशाच तक्रारी करण्यात आल्या आहेत.

बैठकीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या तक्रारीनंतर शरद पवारांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना पवारांनी उमेदवारांना दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात वकिलांची टीम करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आहे. राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम स्थापन केली असल्याची माहिती सूत्रांची दिली.

'आता मागे हटायच नाही लढायचं,' असा संदेश पवारांनी उमेदवारांना दिला आहे. पवारांनी बोलावलेल्या बैठकीत ईव्हीएम आणि मतांची एकूण गोळाबेरीज जुळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

२८ तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी, अशी ही सूचना बैठकीत देण्यात आली आहे. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरूवात करण्यात आली त्याच प्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याचे समजते.

शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेने देखील आपल्या बैठकीत ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही ईव्हीएमबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात ईव्हीएम मतदान न घेता बॅलेटवर मतदान घ्या, अशी मागणी जोर धरेल, यांची शक्यता नाकारता येत नाही. ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान घ्या, याबाबतची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली केली होती, ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT