Sharad Pawar Uddhav Thackeray Raj Thackeray  sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का? माजी आमदार कपिल पाटलांचा थेट सवाल

Kapil Patil Uddhav Thackeray Raj Thackeray : राज ठाकरे यांनी सर्वच पक्षातल्या मराठी जनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि संदीप देशपांडे यांनी जी खंत व्यक्त केली आहे, त्याचं काय ? असा प्रश्न कपिल पाटील यांनी विचारला आहे.

Roshan More

Uddhav Thackeray Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण राज-उद्धव एकत्र येणार यावरून चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मराठी माणसाचे कल्याणच होईल, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र, दोन भावांचं भांडण संपल्याने, महाराष्ट्राचा, मराठीचा प्रश्न सुटेल का ? मुंबई बाहेर फेकला गेलेला, बदलापूर - नालासोपारा - पनवेलला विस्थापित झालेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत येईल का ? असा सवाल माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी सर्वच पक्षातल्या मराठी जनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि संदीप देशपांडे यांनी जी खंत व्यक्त केली आहे, त्याचं काय ? मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का? असा देखील सवाल कपिल पाटील यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून विचारला आहे.

ठाकरे बंधू एकत्र येतील पण मुंबई, महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील का? असे म्हणत कपिल पाटील यांनी आपल्या पोस्टमधून प्रश्नांचा भडिमार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना मुंबईत घर मिळेल का ? सत्ता असूनही गेल्या 25 वर्षात आजारी पडलेली बीएमसी हॉस्पिटलं बरी होतील का ? पालिकेतली कंत्राटं मराठी माणसाला मिळतील का ?

शिंदे-भुजबळ-राणे का नको?

ठाकरे बंधूंनी मराठी म्हणून एकत्र येण्याच्या आवाहनावर मान्य करा न करा, निवडणूकीत लोक मान्यता मिळालेले सामान्य बहुजन शिवसैनिकांचा चेहरा बनलेले एकनाथ शिंदे, कोकणी माणसाचे नारायण राणे, ओबीसींचा आवाज छगन भुजबळ, हे तर मूळ शिवसैनिकच. मग ते का नकोत ? असा खणखणीत प्रश्न विचारला आहे. तसेच मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, जरांगे पाटलांचा गरजवंत मराठा आणि आंबेडकरांचा बौद्ध समाज हे सर्व मराठीच्या परिघात येत नाहीत का? असा टोलाही लगावला.

..तर फक्त डोकी फुटतील

आपल्या फेसबूक पोस्टच्या समारोपामध्ये कपिल पाटील यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूत हिंदूच राहतात. पण हिंदुत्ववादी राजकारणाला त्यांनी थारा दिला नाही. म्हणून ते टिकले. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी राजकारणाने मराठी भाषिकांचं राजकारण आणि महाराष्ट्र धर्मही बुडवला त्याचं काय ? एकत्र येऊन या प्रश्नांना उत्तरं मिळणार असतील तर स्वागतच. अन्यथा मराठी तरुणांची डोकी फक्त फुटतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT