kirit somaiya.
kirit somaiya. 
मुंबई

माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली. गटारात पडून शीतल दामा या महिलेचा गटारात पडून मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांनी घाटकोपरमध्ये आज आंदोलन केले.  यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन असून घाटकोपर पोलिस ठाण्यात नेले.

महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. शीतल दामा यांचा 11 वर्षांचा मुलगा, त्यांचे पती व किरीट सोमय्या यांच्यासह शंभर जणांना पोलिसांनी अटक केली. शीतल दामांच्या मृत्यूला 13 दिवस झाले तरी गुन्हा का नोंदविला नाही, असा सवाल किरीट सोमय्या उपस्थित केला आहे.

 
घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल या गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. पण दोन तास होऊनही त्या घरी आल्याच नाहीत. त्यामुळे कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. जवळच बंदिस्त नाला होता आणि त्यावरील काँक्रीटचे झाकण उचकटले होते. त्याच सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. यात पालिकेचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT