<div class="paragraphs"><p>Abu Azmi </p></div>

Abu Azmi

 

Sarkarnama 

मुंबई

हिंदू-मुस्लिम तणाव कोण वाढवतयं? अबु आझमी आणि भाजप सदस्यांत हमरीतुमरी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सध्या मुंबईत हिंदूची अवस्था वाईट असून हा समाज धास्तीत जगत असल्याचा आरोप भाजप आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal prasad Lodha) यांनी विधानसभेत केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी (Abu Azmi) यांनी आक्षेप घेतला.

काही लोक देशात हिंदू - मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्नात आहेत. स्वतः पंतप्रधानांनी वाराणसी मधे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेताना औरंगजेबाचा बंदोबस्त केल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी होते, असे सांगत हा वाद वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजप आमदार आणि अबु आजमी यांच्यात विधानसभेत जोरदार हमरीतुमरीचा प्रसंग उद्भवला.

गृह विभागाच्या पुरवणी मागण्यावर बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विरोध करत रजा अकादमी वर बंदी घालण्याची मागणी केली. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी या सभागृहातील काही सदस्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचा दाखला देत लोढा यांनी अबु आझमी यांच्याकडे उंगलीनिर्देश केला.
यावरून आजमी यांनीही या देशात हिंदु-मुस्लिम एकता हाच देशाचा आत्मा आहे, असे सांगत शिवाजी महाराजांचे नाव घेऊन काही लोक हिंदु-मुस्लिम वाद पेटवतात. या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली.

मात्र आजमी यांनी पंतप्रधानाचे नाव घेतल्याने भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील रिकाम्या जागेत जावून जोरदार घोषणाबाजी केली. ‘जो हिंदू की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ अशी घोषणाही आमदार लोढा यांनी दिली.

अखेर तणाव निवळला
हा तणाव वाढत असल्याचे पाहून पीठासीन अधिकारी कुणाल रोहिदास पाटील यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना बोलण्यापासून रोखत, अबु आझमी यांच्या वक्तव्य तपासून जे आक्षेपार्ह असेल ते कामकाजातून काढले जाईल असे निर्देश देत पुढील सदस्याला संधी दिली. यामुळे हा तणाव तातडीने निवळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT