Uddhav Thackeray|Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

याकूब कबर प्रकरणी फडणवीस आरोपीच्या पिंजऱ्यात पण... 'सामना'तून जळजळीत टीकास्त्र

Yakub Memon : फडणवीसांचा उल्लेख '(उप)-मुख्यमंत्री' करत डिवचण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज (Saamana Editorial) याकूब मेमन कबर प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाना साधण्यात आले आहे. आम्ही देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो, पण निदान आम्ही तरी राजकारण इतक्या खालच्या स्तरावर नेऊ इच्छीत नाही, अशी टीका भाजपवर करण्यात आली. तसेच फडणवीसा यांचा उल्लेख '(उप)-मुख्यमंत्री' म्हणत त्यांना डिवचण्यात आले.

“याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना (Devendra Fadnavis) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही. मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती”, असं जोरदारपणे सुनावत, भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही सामनातून घणाघात करण्यात आले.

नुकताच याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीच्या मुद्द्यावर राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले होते. याचे आरोप भाजपने मागील ठाकरे सरकारवर केले होते. याबाबत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. आता, 'होऊनच जाऊ द्या! आम्ही त्या चौकशीचे स्वागतच करीत आहोत, असे आव्हान सामनामधून देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT