Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : तुमची मुलगी ही आमचीही मुलगी; आव्हाडांना फडणवीसांकडून धीर; केली मोठी घोषणा!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली आहे. ''तुमची मुलगी ही आमची मुलगी आहे. आपण आश्वस्त राहा'', असं म्हणत फडणवीसांनी आव्हाडांना धीर दिला.

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेवर उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, ''जितेंद्र आव्हाड यांनी पोटतिडकीने एका अधिकाऱ्यासंदर्भातील विषय मांडला.

मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही असाल, तुमची कन्या असेल, तुमचा परिवार असेल त्यांना कुठल्याही धोक्यामध्ये येऊ दिले जाणार नाही. त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरविली जाईल'', असं अश्वासन त्यांनी दिलं.

''कुटुंबावर कोणी टिकाटिप्पणी करत असेल किंवा धमकी देण्याचा प्रयत्न कुणीही केला असेल तर हे अजिबात सहन केले जाणार नाही. मी ही केस सीआयडीकडे ट्रान्सफर करतो. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात विशेष अधिकारी नियुक्त करून या केसची स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही'', असं यावेळी ते म्हणाले.

''मी स्वत: याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी देखील सांगितलं की, अशा प्रकारच्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत'', असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर आता या प्रकरणी सीआयडी चौकशीची घोषणा करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT