Sakal-Saam Survey Sarkarnama
मुंबई

Sakal-Saam Survey : मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना सर्वाधिक पसंती;पण उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती, दुसऱ्या स्थानावर झेप

उद्धव ठाकरे यांना १९.४ टक्के जनतेने मुख्यमंत्रिपदासाठी निवडले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politic's : सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्व्हेत मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली आहे. राज्यातील २१.९ टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पसंती दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतरसुद्धा उद्धव ठाकरे यांना राज्यातील १९.४ टक्के लोकांनी कौल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत राज्यात सहानुभूती असल्याचे दिसून येत आहे. (Fadnavis is most preferred for CM Post; but Uddhav Thackeray has great sympathy)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड करून अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणावर राज्यातील जनतेचे मत आजमावण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने एक सर्व्हे केला. त्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती ही पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलेली आहे.

सकाळ माध्यम समूहाने राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघात आणि ४८ लोकसभा मतदारसंघातील ७३ हजार ३३० लोकांचा कल जाणून घेण्यात आलेला आहे. त्यात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना २१.९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या स्थानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी झेप घेतली आहे. त्यांना १९.४ टक्के जनतेने निवडले आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ८.५ टक्के, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ९.५ टक्के, सुप्रिया सुळे यांनाही ८.५ लोकांनी पसंती दिली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना ६.६, बाळासाहेब थोरात यांना ४.२, जयंत पाटील यांना ३.६ लोकांनी पसंती दिलेली आहे. सांगता येत नाही असे १७.७ टक्के लोकांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT