Devendra Fadanvis
Devendra Fadanvis sarkarnama
मुंबई

फडणवीसांनी कॉंग्रेसचे २२ आमदार फोडलेत ; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Khaire| मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल. म्हणून फडणवीसांनी आतापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यातून फडणवीस त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवतील, असा दावाही खैरेंनी केला आहे. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे.

राज्यात शिंदे- फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. भाजपचेही या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. पण हे आमदार अपात्र ठरले, तरी सरकार पडू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच तजवीज करुन ठेवली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कॉंग्रेसचे २२ आमदार फुटले आहेत. पण सध्या कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु असल्याने ते शांत आहेत. असही खैरे यांनी म्हटलं आहे.

इतकेच नव्हे तर चाळीस आमदारासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील यापुढे निवडूण येणार नाहीत. नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखी माणसे पडतात, मग हे कोण आहेत. आज लोकांमध्ये या आमदारांबद्दल प्रचंड चीड आहे. पैसा गौण आहे, आज आहे उद्या नाही. पण लोक पाहतात कोणी पैसे घेतले, कोण काय करतय. आता पहा काय होतयं ते. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ठाण्यात एकनाथ शिंदेंची ताकद आहे असे विचारले असता चंद्रकांत खैरे म्हणाले की, ठाण्यात जर त्यांची ताकद होती तर आमचे ठाण्याचे खासदार का नाही गेले त्यांच्याकडे असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ते मुख्यमंत्री असले तरी ते पडतील, त्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसेनेशी गद्दारी केली. म्हणून त्यांना पाडतील. राज्यात आता कधीही मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. कदाचित राष्ट्रपती राजवटही लागू शकते, असं खैरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी सिल्लोडमध्ये ठाकरे गटाला सभेची परवानगी नाकारल्याबद्दल विचारले असता, खैरे म्हणाले की, सिल्लोडमध्ये आमची भरपूर ताकद आहे. आमची ताकदीवरच अब्दुल सत्तार निवडूण आले. शिवसेनेचा क्राऊड जमा व्हायला वेळ लागत नाही. सत्तार सरडा आहे. तो रंग बदलतो असा टोलाही चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT