Five State Election News: Sarkarnama
मुंबई

Five State Election News: पाच राज्यांतील निवडणुकांसाठी केंद्रात बैठक: फडणवीसांना मिळणार मोठी जबाबदारी ?

BJP Politics : या वर्षाअखेर देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : या वर्षाअखेरीस देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. २०२४ च्या लोकसभेची ती रंगीत तालीम असल्याने भाजपने या निवडणुका खूप गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यासाठी आतापासून तयारीला लागले असून या पाच राज्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक समितीची आज (ता.१६) दिल्लीत बैठक बोलावली आहे.

राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम आणि मध्यप्रदेश या राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. कारण तेथील विधानसभेची मुदत ही वर्षअखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरवातीस संपत आहे. दरम्यान, आजच्या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित राहणार असल्याचे समजते. त्यातून त्यांना या पाचपैकी एखाद्या राज्याचे प्रभारी केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यातून महाराष्ट्राबाहेर आणि पक्षात दिल्लीत तथा राष्ट्रीय पातळीवर भाजपमध्ये त्यांचे किती मोठे वजन आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक संध्याकाळी पाच वाजता पक्ष कार्यालयात होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह समितीचे इतर १५ सदस्य तिला उपस्थित राहणार आहेत. यावेळी या राज्यांतील तयारीसह तेथील उमेदवारीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.पाचपैकी फक्त मध्यप्रदेशात भाजप सत्तेत आहे. आगामी लोकसभेला बहूमत मिळविण्यासाठी बाकीच्या चार राज्यांतही भाजपला ताकद वाढवायची असल्याने त्यांनी या पाच राज्यांची निवडणूक खूप महत्वाची केली असून ती गांभीर्याने घेतली आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी आहे. अशा जागांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच, या जागांसाठीचे उमेदवार आधीच निवडले जाणार आहेत. जेणेकरून त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा ही विरोधी शासित राज्ये असून भाजप यावेळी जिंकण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. यामुळे या निवडणुकांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT