Nawab Malik News update sarkarnama
मुंबई

Nawab Malik News : भाजप नेत्याकडून मलिकांचा 'फर्जीवाडा' उघड ; 'एका महिलेला..'

NCP News : कंबोज यांनी मलिक यांना त्यांच्या 'फर्जीवाडा'या शब्दांची आठवण करुन दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

Nawab Malik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, जामीन अर्जासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. अशातच त्यांचे चिंरजीव फराज मलिक यांच्याविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात (Kurla police station) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मलिक कुटुंबियांसमोरील अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.

फराज मलिक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी टि्वट करीत मलिक यांना त्यांच्या 'फर्जीवाडा'या शब्दांची आठवण करुन दिली आहे. मोहित कंबोज यांनी टि्वट करीत नवाब मलिक यांची खिल्ली उडवली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे फराज मलिक यांनी एका फ्रान्सच्या महिलेला तिच्या व्हिसाची मुदत वाढवून देण्यासाठी मदत केली, यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. ही घटना २०२० मध्य घडली आहे. याबाबत त्यांच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एनसीबीकडून क्रुज ड्रग्ज प्रकरणात करण्यात आलेली कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते,माजी मंत्री नवाब मलीक यांनी हा सगळा 'फर्जीवाडा', आहे असा आरोप केला होता.

मलिकांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील खोटे दस्ताऐवज दाखवत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेला 'फर्जीवाडा'माध्यमाच्या समोर आणला होता. क्रुज ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी'फर्जीवाडा'हा शब्द काइन केला होता.

नवाब मलिक यांच्यावर ‘फर्जीवाडा’ हा त्यांचाच शब्द वापरून मोहित कंबोज यांनी हल्लाबोल केला आहे. यापूर्वी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने मलिक यांच्यावर हल्लाबोल केला होता त्यावेळी रेडेकर यांनी हा शब्द वापरुन मलिकांवर हल्लाबोल केला होता.

एनसीबीकडून क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीनचीट मिळाली. हा सगळा प्रकार बनाव असल्याचे सिद्ध झाले आहे. नवाब मलिकांनी फर्जीवाडा म्हणून त्यातील सत्य सगळ्यांसमोर आणले होते. प्रसार माध्यमांनी देखील तेव्हा मलिकांना खूप साथ दिली. ते प्रकरण फर्जीवाडा होते हे सिद्ध झाले आहे.

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आलं.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमरिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने (ED) धाडी टाकल्या होत्या. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT