Eknath Shinde Latest Marathi News News Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी! अखेर शिंदे गटाला नवीन चिन्ह मिळालं...

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही गटांना धक्का बसला होता.

Vishnu Sanap

मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अखेर ढाल तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे. काल शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या चिन्हाच्या तीनही पर्यायांना बाद करण्यात आले होते. तर त्यांना दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते. चिन्हांचा पर्याय देण्यासाठी शिंदे गटाला आज सकाळी दहा पर्यंतची वेळ दिला होता.

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तळपता सुर्य, ढाल तलवार, पिंपळाचं झाड ही तीन चिन्ह देण्यात आली होती. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही गटांना धक्का बसला होता. त्यानंतर दोन्ही गटांना कोणती नावं आणि चिन्ह मिळतात, याबद्दल उत्सुकता होती.

उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य, त्रिशूळ या चिन्हांवर दावा केला त्यासोबतच शिंदे गटाने गदा हा पर्याय देखील दिला होते. मात्र, धार्मिक मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची त्रिशुळ आणि गदा ही चिन्ह बाद केली. मात्र उगवता सूर्य या चिन्ह आधीच एका पक्षाचं चिन्ह असल्याने ते कुणालाही दिले नाही. त्यामुळं शिंदे गटाला पुन्हा नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काल दिले होते. त्यानुसार त्यांनी इमेलद्वारे तीन चिन्हांचा पर्याय दिला होता. त्यापैकी त्याना ढाल तलवार हे चिन्ह त्यांना देण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT