Uddhav Thackeray &  Latest News
Uddhav Thackeray & Latest News  Sarkarnama
मुंबई

खासदारांची मन की बात उद्धव ठाकरेंनी मानली; मुर्मू यांना पाठिंबा केला जाहीर

सरकारनामा ब्यूरो

Presidential election : शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

हा घेतलेला निर्णय कोणत्याही दबावात घेतला नसून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला आग्रह केला यामुळे आम्ही मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, प्रथमच आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रकारे राज्यात राजकारण सुरू आहे हे बघता आम्ही विरोध करायला पाहीजे. मात्र, आम्ही एवढ्या छोट्या मनाचे नाही. याआधीही आम्ही माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना आम्ही पाठिंबा दिला होता.

ते म्हणाले, गेल्या चार ते पाच दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली. त्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आल्या होत्या. याबरोबरच एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केली की, पहिल्यांदाच आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण त्यांना हा पाठिंबा दिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल. या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे ठाकरेंनी जाहीर केलं.

दरम्यान, काल 'मोतोश्री'वर ठाकरेंसोबत झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीसंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरही ठाकरेंनी आज स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, राष्ट्रपतीपदाची निवडणूक समोर आली आहे. मी मुद्दाम स्वत: तुमच्यासमोर बसलोय कारण काही बातम्या विचित्रपणे तुमच्यापर्यंत आल्या. स्पष्टपणे सांगतो की, कालच्या खासदारांच्या बैठकीत कुणीही माझ्यावर दबाव टाकला नसून सगळ्यांनी माझ्यावर निर्णय सोपवला आहे. आजही मातोश्री'वर रीघ लागली आहे. त्यातमध्ये मी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर खासदारांसोबतही चर्चा केल्याचे ठाकरेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT