Amruta Fadnavis
Amruta Fadnavis  Sarkarnama
मुंबई

अमृता फडणवीसांबद्दलचं अक्षेपार्ह बोलणं अंगलट; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अडचणीत

सरकारनामा ब्युरो

वाशी : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे चांगलेच वादात सापडले आहे. अशातच भाजपच्या (BJP) आमदार मंत्रा म्हात्रे आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता गावडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. गावडे यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात पोलिसांनी कलम ५०९ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या जिल्हाध्यक्ष दुर्गा डोख यांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्त्री वर्गाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका नवी मुंबई भाजपकडून घेण्यात आली होती. तसेच गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा त्यांना नवी मुंबईत महिला फिरू देणार नाही, असा इशारा भाजपच्या आमदार मंत्रा म्हात्रे इशारा दिला होता.

काय म्हणाले होते गावडे?

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू होते. त्यावेळी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, यांची देखील भाषणे झाली. त्याचवेळी अशोक गावडे हे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली.

"आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते" असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

"राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा, कोणत्या मस्तीत आहे हा?"

दरम्यान गावडे यांच्या वक्तव्याविरोधात चित्रा वाघ यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "अशोक गावडेची जीभ छाटा. राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष, कुठल्या मस्तीतं आहे? अमृता फडणवीस यांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि यात कोणालाही महिलांचा अपमान, विनयभंग दिसत नाही का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही वाघ यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT