Kishori Pednekar News Sarkarnama
मुंबई

Covid Center Scam : ठाकरेंच्या शिवसेनेतील वाघीण जेरबंद होणार ? ; पेडणेकरांवर 'या' प्रकरणात गुन्हा दाखल

Kishori Pednekar News : पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ठाकरे सरकार कोसळले, ठाकरेंची शिवसेना फुटली, ‘मातोश्री’ला ‘दगाबाजी’नी घेरले ; तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी पदर खोचून लढणाऱ्या अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेची वाघीण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आता ‘पिंजऱ्या’त अडकण्याची भीती आहे.

पेडणेकरांना अडकविण्यासाठी उकरून काढलेल्या कोविड घोटळ्यात आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे ठाकरेंना जबरदस्त धक्का आहे, पण त्यापलीकडे जाऊन पेडणेकरांना ‘जेरबंद’ करण्याच्यासाठी उद्देशाने विरोधकांनी मोठे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षातूनच पेडणेकरांवर जाळे टाकले गेले असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईच्या महापौरपदावर असताना पेडणेकरांनी नेटाने काम केले. त्यांच्या कार्यकाळात कोविड घोटोळा झाल्यावरून त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यावरून चौकशांच्या फेऱ्यात अडकल्या. तरीही, ठाकरेंच्या बाजुने काम लढत राहिल्या.

ठाकरे सरकार गेल्यानंंतर आणि शिवसेनेत बंड झाल्यानंतरही पेडणेकर डगमगल्या नाहीत. उलटपक्षी त्या रोजच स्वपक्षातील विरोधकांसह भाजप नेत्यांवर तोंडसुख घेत राहिल्या. या काळात पेडणेकरांना शिंदे गटात प्रवेशाचीही ऑफर असल्याचीही चर्चा होती.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पेडणेकरही ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले होते. त्यावर पेडणेकरांनी खुलास करीत, ठाकरेंची. शिवसेना सोडणार नसल्याचे सांगितले होते.किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण..

कोविड प्रकरणात बॉडी बॅग खरेदी घोट्याळ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला कोविड काळात नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यात आले होते, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2 हजारांऐवजी 6800 रुपयांना खरेदी करण्यात आली होती.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT