Abhishek Ghosalkar Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar News : मुंबई पुन्हा हादरली! ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; चार गोळ्या लागल्या

Mayur Ratnaparkhe

Mumbai Crime News : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला. दहिसर भागात ही घटना घडल्यानंतर, बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात अभिषेक घोसाळकर यांना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याचे सांगितलं जात आहे.

घटनेची माहिती मिळाताच ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत, तर या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. अभिषेक हे माजी आमदार आणि उद्धव यांचे विश्वासू नेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक यांच्या पत्नी प्रीती घोसाळकर या सध्या नगरसेविका आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई उपनगरात शिवसेना वळवण्यासाठी घोसाळकर परिवाराने खूप मेहनत घेतली आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानंतरसुद्धा घोसाळकर परिवार मातोश्रीपासून दूर झाला नव्हता. सध्या आगामी निवडणुकांच्या तयारीला हे कुटुंब लागले असताना युवा नेता अभिषेक यांच्यावर हल्ला झाल्याने बोरिवली आणि दहिसर परिसर हादरला आहे.

हा गोळीबार मॉरिस नावाच्या व्यक्तीने केल्याची माहिती समोर आली असून, विशेष म्हणजे गोळीबारानंतर या मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने स्वत:वर सुद्धा चार गोळ्या झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज सायंकाळी साडेसातच्या आसपास अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला गेला.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच शिवसेना शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ज्यामध्ये महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्याने ते सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा ही गोळीबाराची घटना समोर आल्याने, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT