Covid 19
Covid 19 
मुंबई

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस (Covid Pandemic) चा धोका हळूहळू वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या प्रकरणांवर महाराष्ट्र सरकारने सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या १३५ केसेस आहेत, त्यापैकी ८५ केसेस मुंबईत आहेत. महाराष्ट्राने याआधी चाळीस हजाराहून अधिक केसेस दररोज पाहिल्या आहेत. त्यामुळे आताची परिस्थिती ही नियंत्रणात आहे. कोणतेही घाबरण्याचे कारण नाही. लसीकरण झाल्यामुळे सुरक्षा कवच मिळाले आहे. तसेच १२ ते १८ वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांमध्ये लसीकरण वाढावे यासाठी प्रबोधन करत आहोत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बुस्टर डोस आपण स्वतःहून देत नाही आहोत. पण ज्यांच्यात अँटीबॉडीज कमी असतील त्यांनी खासगी रुग्णालयातून बुस्टर डोस घेण्यास अडचण नाही. आज काळजी करण्याचा कोणताही विषय नाही. मास्क सक्ती आपण हटवली आहे, त्यासाठी दंड लावला जात नाही. मात्र कॉमोर्बिटिज असलेल्या लोकांनी मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाश्चिमात्य देशात काही प्रमाणात केसेस वाढत आहेत. दिल्लीतही केसेस वाढलेल्या दिसत आहेत. आयसीएमआर, केंद्र सरकार आणि राज्याचा आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्ही ट्रॅकिंग सिस्टीमवर भर दिला असून टास्क फोर्सकडून सर्व माहिती घेत आहोत, आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही लहान मुलांनाही लस देण्यास सुरुवात केली आहे. 12 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांनाही लस दिली जात आहे, ज्येष्ठ नागरिकांना खासगी रुग्णालयात बूस्टर डोस दिला जात आहे.

रुग्णांची संख्या पाहता सध्या तरी मास्क अनिवार्य करण्याची गरज नाही, मात्र तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याची गरज आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारचे लाऊडस्पीकरबाबत नियम बनवत आहे, जेव्हा हे नियम लागू होतील तेव्हा सर्व प्रकरणे संपतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दुसऱ्यांदा पत्र पाठवून महाराष्ट्रासह पाच राज्यांना सतर्क केले आहे. पाच दिवसांपूर्वी असेच पत्र राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिले होते. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्यांनी या राज्यांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे. केंद्र सरकार देशातील कोविडशी संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांमधून कोरोनाविरोधी निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्क घालण्याची सक्तीही रद्द करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा वाढत्या कोरोना रुग्णांच्या बातम्यांनी चिंता वाढवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT