Mukul Rohatgi  Sarkarnama
मुंबई

एनसीबीवर ताशेरे ओढून मुकुल रोहतगी म्हणाले...

माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा (Mummun Dhamecha) आणि अरबाझ मर्चंट (Arbaaz Merchant) या तिघांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. आर्यन खानच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली होती. त्यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (NCB) कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करीत शहाणपणाचा सल्लाही दिला आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुकुल रोहतगी म्हणाले की, कोणताही पुरावा नसताना आर्यन खानचे प्रकरण एनसीबीने खूप ताणले. एकदा संशयिताला पकडल्यानंतर त्याला कारागृहातूच डांबून ठेवण्याचा प्रयत्न भारतीय तपास यंत्रणा करतात. यामुळे कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबले जात आहेत. याबाबत भारतीय तपास यंत्रणांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. अमली पदार्थाचे सेवन, विक्री अथवा मोठ्या प्रमाणात जवळ बाळगल्याचा कोणताही पुरावा नव्हता. तरीही एनसीबीने अमली पदार्थांच्या विक्रीचा दावा करीत हे प्रकरण खूप ताणले.

आर्यनला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना रोहतगी म्हणाले की, या खटल्यात दोन पैलू महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे आर्यनकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नव्हते आणि दुसरा म्हणजे तो अरबाज मर्चंटशी निगडित होता. एखाद्या व्यक्तीकडे छोट्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्यास त्याकडे वेगळ्या नजरेने पाहायची आवश्यकता आहे. परंतु, केंद्रीय यंत्रणांना यात फरक करण्यात अयशी ठरतात. ते थेट व्यावसायिक प्रमाणाकडे उडी मारतात.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती.

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार होता. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी आर्यनची सुटका झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT