Former MLA Sudhakar Bhalerao meets Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Politics: लोकसभेच्या निकालाआधीच इच्छुकांची विधानसभेसाठी धावाधाव? भाजपच्या माजी आमदाराने थेट पवारांना गाठलं

Former MLA Sudhakar Bhalerao meets Sharad Pawar Before Lok Sabha Election Result: लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Jagdish Patil

Former MLA Sudhakar Bhalerao meets Sharad Pawar: देशाची सत्ता पुढील पाच वर्ष कोणाच्या हातात असणार याचा फैसला उद्या होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच सोमवारी (ता. 3 जून) रोजी भाजपच्या एका माजी आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उद्याच्या लोकसभेच्या निकालावर राज्यातील विधानसभा निवडणुकीची बरीच गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर राज्यात आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरण, युती आघाड्यांमुळे विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढणार यात शंका नाही.

शिवाय महायुतीत सहभागी होण्यासाठी भाजपकडून (BJP) मित्रपक्षातील अनेक नाराजांना विधानसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे उद्याच्या निकालापूर्वीच विधानसभेची उमेदवारी पक्की करण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच सोमवारी भाजपचे उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवारांची भेट घेतली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुधाकर भालेराव हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी आले होते. सध्या उदगीर विधानसभेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार आहेत. सुधाकर भालेराव आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, युतीत सध्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिवाय लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्याची शक्यता दाड आहे. त्यामुळे उदगीरमधून उभं राहण्यासाठी भालेराव यांनी दुसऱ्या पक्षाची चाचपणी सुरु केली की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

उद्याच्या निकालावर पुढचं गणित ठरणार

लोकसभेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. देशात पुन्हा मोदींची हवा असली तरी राज्यातील महायुतीला अपेक्षित यश मिळणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलने दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती महायुतीसाठी धोक्याची ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर विधानसभेतही काहीशी हीच परिस्थिती असू शकते. त्यामुळे उद्याच्या राज्यातील लोकसभेच्या निकालावर विधानसभेची बरीच गणितं अबलंबून असणार आहेत, यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT