corporation Abhishek Ghosalkar death firing Mauris Noronha  Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Shot Dead : मॉरिसचे 'ते' प्रकरण भोवले! अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे वेगळाच संशय

Sena UBT ex-corporator Shot Dead : दिवाळीमध्ये मॉरिसने अभिषेक यांच्याशी मैत्री केली. दहिसर बोरवली परिसरामध्ये अभिषेक यांच्यासोबत दिवाळीच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छांचे बॅनरदेखील मॉरिशनी लावले होते.

सरकारनामा ब्यूरो

Abhishek Ghosalkar Death : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता.8) रात्री हत्या झाली. फेसबुक लाइव्ह करणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. मॉरिसने स्वत:देखील आत्महत्या केली.

मॉरिसनी घोसाळकर यांच्यावर गोळीबार का केला? याचा तपास पोलिस करत आहेत. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी दोन जणांना ताब्यातदेखील घेतले आहे. मात्र, एका जुन्या प्रकरणातून मॉरिसने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. (Abhishek Ghosalkar Shot Dead News in Marathi)

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेहुल पारेख (Mehul Parekh) आणि रोहित शाहू (Rohit Shahu) ऊर्फ रावण या दोन दोघांनी अभिषेक यांच्या हत्येपूर्वी ऑफिसची रेकी केली होती. या दोघांना या घटनेची संपूर्ण माहिती असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या टीमकडून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.

अटक झाल्याचा राग

2022 मध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून मॉरिस याला 376 च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणात महिलेला अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांनी मदत केल्याचा मॉरिस याला संशय होता. या प्रकरणात मॉरिस सहा महिने तुरुंगात होता त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर त्याने दिवाळीमध्ये अभिषेक यांच्याशी मैत्री केली.

दहिसर बोरवली परिसरामध्ये अभिषेक यांच्यासोबत दिवाळीच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छांचे बॅनरदेखील मॉरिशनी लावले होते. मात्र, त्याच्या मनात अभिषेक यांच्याविषयी राग कायम होता, अशी चर्चा आहे.

समाजसेवक म्हणून ओळख

मॉरिस नोव्हेका (Mauris Noronha) हा समाजसेवक म्हणून आपली ओळख करून द्यायचा. ज्या परिसरात मॉरिस समाजसेवक म्हणून काम करत होता. त्या परिसरात घोसाळकर यांचा मागील 10 वर्षांपासून दबदबा आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक नागरिकांना आर्थिक व धान्याची मदत, रिक्षा चालक, तसेच दहिसर पश्चिमेच्या गणपत पाटीलनगरमध्ये झोपडपट्टीमध्ये राशन वाटप करत समाजसेवा करत असताना त्याला नगरसेवक बनायची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली.

जेलमध्ये गेल्याचा राग काढला?

जेलमध्ये गेल्याचा राग मॉरिसच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अभिषेक याचा काटा काढण्यासाठी त्याने अभिषेक यांच्यासोबत मैत्री केली आणि अभिषेक यांची हत्या केली. मॉरिस भाई म्हणून आय.सी. कॉलनीमध्ये त्याचे आलिशान ऑफिस आहे. मॉरिस याच्या कार्यालयात गुंड प्रवृत्तीचे लोकांचेदेखील येणे-जाणे होते.

दोन जण ताब्यात, हत्येपूर्वी रेकी

पोलिसांनी या प्रकरणात मॉरिसचे समर्थक मेहुल पारेख व राहुल साहू ऊर्फ रावण या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अगोदर या दोघांनी रेकी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मॉरिशच्या कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत.

मॉरिस (Mauris) वापरलेली बंदूक व जिवंत काडतुसासह पोलिसांनी ताब्यात घेतले. मॉरिसकडे कोणत्याही प्रकारची शस्त्र परवाना नव्हता. त्यामुळे हत्या करण्यासाठी त्याने वापरलेली बंदूक कुठून आली, असा प्रश्न आहेत. त्याचवेळी ही बंदूक दहिसरमधील एका अधिकृत बंदूक परवाना असलेल्या व्यक्तीकडून दहा लाख रुपये देऊन विकत घेतल्याचीदेखील चर्चा रंगत आहे.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) नगरसेवक होते. त्यानंतर दहिसर विधानसभा क्षेत्रातून आमदार झाले. पुन्हा त्यांचे सुपुत्र अभिषेक 2019, 2014 ला नगरसेवक झाले. त्यांची पत्नी 2019 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या. तब्बल 20 पेक्षा अधिक काळ या परिसराचे नेतृत्व घोसाळकर परिवाराने केले.

त्यामुळे घोसाळकर यांचा बालेकिल्ला म्हणून हा परिसर ओळखला जातो. बोरिवली येथील दौलतनगर स्मशानभूमी दुपारी तीन वाजता अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून बोरिवली, दहिसर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT