Vilas Patil News Sarkarnama
मुंबई

Vilas Patil News: महापौर निवडणुकीआधीच 'किंगमेकर'ला पोलिसांनी उचललं; भिवंडीच्या माजी महापौरांना अटक

Bhiwandi Mayor Election Controversy: .महापौर निवडीतील 'किंगमेकर' ठरणाऱ्या माजी महापौरांनाच अटक केल्याने महापौर निवडणुकीआधी भिवंडीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Mangesh Mahale

Bhiwandi Mayor Election News: भिवंडी महापालिका महापौरपदाचा तिढा अद्याप सुटला नाही, महापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु असतानाच माजी महापौर, आणि कोणार्क विकास आघाडीचे संस्थापक विलास पाटील यांनी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे.

विलास पाटील यांना शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विलास पाटील यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पाटील यांच्या कारवाईचे पडसाद आगामी काळात भिवंडीच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाटील यांच्या अटकेमुळे कोणार्क विकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.महापौर निवडीतील 'किंगमेकर' ठरणाऱ्या माजी महापौरांनाच अटक केल्याने महापौर निवडणुकीआधी भिवंडीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  

२०२५ मध्ये दाखल झालेल्या प्रकरणात विलास पाटील यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ⁠घरे देण्याच्या बहाणे अनेकांची विलास पाटील यांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. ⁠भाजपाने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे..

भाजपचे स्थानिक आमदार महेश चौगले आणि विलास पाटील या दोघांमध्ये राजकीय वाद आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही गटांतील तणाव वाढला होता. त्यानंतर १८ जानेवारी रोजी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT