Maratha Reservation Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : ठाण्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी चार हजार 'प्रगणक' नियुक्त

State Commission for Backward Class : सर्वेक्षणाकरिता नागरिकांसाठी महापालिकेमार्फत हेल्पलाईन सुविधा

Pankaj Rodekar

Thane News : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवार 23 ते 31जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे.

हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लीकेशनद्वारे करण्यात येत आहे. याकामी 250 पर्यवेक्षक व सुमारे 4000'प्रगणक' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित प्रभाग कार्यालयाकडील सहायक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर व कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यांचे अधिनस्त प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचे कामकाज पार पाडण्यात येणार आहे. नेमण्यात आलेल्या सर्व पर्यवेक्षक व प्रगणक यांना रविवार 21 जानेवारी व सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शासनाच्या वतीने महानगरपालिकेने नियुक्त केलेले प्रगणक हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करणार आहेत. तरी या सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे

सर्वेक्षणादरम्यान ॲपच्या माध्यमातून प्रश्नावलीमध्ये नागरिकांनी दिलेली माहिती नोंदविण्यात येणार आहेत. सदर सर्वेक्षणाकरिता नागरिकांसाठी महापालिकेमार्फत हेल्पलाईन सुविधा (8657887101) उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेद्वारे नागरिक सर्वेक्षणाबाबत काही सूचना असल्यास यावर नोंद करु शकतील.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने सुरू असलेल्या या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून यासाठी सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यानुसार राज्यातील शहरी आणि ग्रामीण, महापालिका क्षेत्र भागातील मराठा समाज व सर्वच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवार (ता.23) पासून केले जाणार आहे. तब्बल एक लाख 25 हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जात हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT