Aditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : काळे झेंडे दाखवले, 'फेल इंजिन'; आदित्य ठाकरेंचा महायुतीला जोराचा चिमटा

Aditya Thackeray criticism of the Grand Alliance : युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीला भाजपकडून दाखवण्यात आलेल्या काळ्या झेंड्यांवरून महायुतीला फेल इंजिन आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीला भाजपच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. महायुतीत असलेल्या मित्रपक्षाकडून ही कृती झाल्याने महाविकास आघाडीने आता यावर टायमिंग साधण्यास सुरवात केली आहे.

युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर महायुतीला जोराचा चिमटा काढला आहे. 'काळे झेंडे दाखवले! म्हणजेच, ऑल इज वेल आहे का? हे फेल इंजिन आहे', असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

आदित्य ठाकरे मुंबईत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महायुतीतील मित्रपत्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काळे झेंडे दाखवण्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुतीवर निशाणा साधला.

"तिघांमध्ये म्हणजेच, एक सीएम, दोन हाफ सीएम, याच्यात किती ताळमेल आहे का? शासन आपल्या दारी या उपक्रमाचे पुढं काय झालं? यानंतर अनेक योजना जाहीर झाल्या. खूप मोठ्या थाटात योजनांचा प्रारंभ झाला. त्याच्या जाहिराती येतात सगळीकडे. पण पुढे काही होत नाही. एकमेकांचा विरोध असताना, तीन वेगळ्या दिशेला चाललेली लोकं, सरकार चालवण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा फेल इंजिक कसं होतं, ते दिसते", असे आदित्य ठाकरेंनी यांनी म्हटले आहे.

महायुतीत महाफुटी; काँग्रेस टायमिंग साधलं

महायुतीमधील या राड्यावर काँग्रेसने (Congress) टायमिंग साधलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणात महायुतीत आता महाफुटी होण्याच्या मार्गावर असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. लोकसभेच्या निकालामुळे पुरते घाबरलेले नेते विधानसभेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अंतर्गत धुसफूसत आहेत. आता ही धुसफूस हळूहळू चव्हाट्यावर यायला लागली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

नेमकं काय घडलं

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनसन्मान रॅली सुरू केली आहे. सरकारी कार्यक्रम घेऊन देखील घटकपक्षांना डावलले जात आहे, असा आरोप करत महायुतीमधील भाजपने अजित पवार यांच्या रॅलीला नारायणगाव (ता. जुन्नर) इथं काळे झेंडे दाखवले. यातून चांगलाच गोंधळ निर्माण झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते एकमेकांविरोधात आक्रमक झाले असून, टीका करत सुटलेत. मात्र दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी खुलासा करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT