Deepa Chauhan and Ganesh Naik
Deepa Chauhan and Ganesh Naik  Sarkarnama
मुंबई

गणेश नाईकांना अडचणीत आणणाऱ्या दीपा चौहान राष्ट्रवादीच्या वाटेवर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हे अडचणीत आले आहेत. नाईक यांच्यासोबत 27 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा दीपा चौहान (Deepa Chauhan) यांनी केला होता. यानंतर त्यांनी नाईक यांच्या विरोधात पोलिसांकडेही धाव घेतली होती. या प्रकरणी नाईकांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याच दीपा चौहान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. (Ganesh Naik News Updates)

गणेश नाईक यांच्यावर बलात्कार व धमकावणे असे गंभीर आरोप करणाऱ्या दीपा चौहान आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. दीपा चौहान यांनी राष्ट्रवादीच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोंडकर यांना याबाबात पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक असून, काम करण्याची संधी मिळावी, अशी विनंती केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही दीपा चौहान यांनी भेट घेतली आहे. आता दीपा चौहान यांना संधी देत राष्ट्रवादीकडून गणेश नाईक यांची कोंडी केली जाणार का याची उत्सुकता आहे.

याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, मला राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापासूनच आवडतो. मला महिला आयोगानेही संपूर्ण प्रकरणात मदत केली. मी या पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहे. याबाबत विनंतीपत्र मी पक्षाला दिले आहे. त्यांच्या प्रतिसादाची मी वाट बघतेय. मला समाजसेवा करायची आहे. मला समाजसेवेची आवड आहे. माझा व्यक्तिगत मुद्दा आणि राजकारण वेगळे आहे. मला पक्षात संधी मिळाल्यास मी मनापासून काम करेन.

नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्यावर धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. बलात्काराच्या गुन्हयात आधीच न्यायालयाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आता धमकावल्याच्या गुन्ह्यात नाईकांनी केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय यावर 30 एप्रिलला निर्णय सुनावणार आहे. यामुळे नाईकांवरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

दीपा चौहान याबाबत नुकतीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. चौहान यांनी पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा त्यांनी केला होता. नाईक हे 1993 पासून माझे लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच ठार मारण्याची धमकी देऊन माझे शोषण केले, असे या त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर नाईक यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT