Eknath Shinde| Ganesh Naik| 
मुंबई

काय सांगता! गणेश नाईक अन् एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात

Eknath Shinde| Ganesh Naik|गेल्या काही वर्षांपासून आमदार गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे कट्टर विरोधक मानले जात होते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील सर्व मंत्र्यांसह सरकारमधील सर्व मंत्र्यांना वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. युती सरकारमधील शिंदे गट आणि भाजप (BJP) आमदारांसाठी खास स्नेह भोजनाचे आयोजन पार पडले. या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमात एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. बऱ्याच वर्षांनी ठाणे जिल्ह्यातील हे दोन कट्टर नेत्यांनी एकमेकांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

गणेश नाईक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून आमदार गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे कट्टर विरोधक मानले जात होते. हे वर्षा बंगल्यावर पोहोचल ही बातमी ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. कारण अनेक वर्षांपासून गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. या दोन्ही नेत्यांचं कधीही एकमेकांशी जमले नाही. पण काल रात्री गणेश नाईकांना वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.

गणेश नाईक वर्षावर एकनाथ शिंदे यांच्याकडे गणपती दर्शनाला आल्याचे सांगण्यात आले. मात्र ठाण्यातील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आज एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. तीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेत उभी फुट पडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. पण स्थानिक पातळीवर काही प्रमाणात अस्वस्था दिसत होती. त्यातच शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी गणेश नाईकांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरुन शिंदे गट आणि भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या होत्या.त्यानंतर काल रात्री त्यांना एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात पाहिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT