Ganesh Naik
Ganesh Naik  Sarkarnama
मुंबई

गणेश नाईकांवर दुहेरी संकट : अटकेची टांगती तलवार आणि संपत्तीतील वाटाही देण्याची मागणी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. एकीकडे नाईकांच्या अटकेसाठी राजकीय पक्ष आंदोलने करत आहेत तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यावर आता न्यायालयीन लढाई देखील पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलाने दिली आहे. नवी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) कायदेशीर चौकशी सुरू झाली असून आमच्यामार्फत सर्व पुरावे सादर करण्यात आले असल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलांनी दिली आहे.

आम्ही केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला असून आता पुढे जाऊन न्यायालयीन लढाई देखील लढणार आहे. त्यामध्ये देखभाल खर्च, संपत्ती, व्यवसाय अश्या अनेक बाबींची मागणी करणार आहोत. इच्छा नसताना त्या नात्यात पीडितेला भाग घ्यावा लागला आहे. कारण त्यावेळी नाईक हे मंत्री होते आणि महिलेवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे पोलिस आता काय कारवाई करतात याकडे आमची नजर असून आमचा लढा न्याय मिळवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या वकिल ऍड लुसी मेस्सी यांनी दिली आहे.

पीडित महिलेने आपल्याला भेटत असलेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केल आहे. आम्हाला न्याय भेटणार नसेल तर आम्ही कोर्टात जाणार याबद्दल आपण गणेश नाईकांना आधीच कल्पना दिली होती, असेही पीडित महिलेने सांगितले. तर नाईकांच्या अटकेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, पोलिसांनी त्यांची कारवाई करावी. मी माझ्या मुलाला न्याय देण्यासाठी लढत आहे, अशी प्रतिक्रिया पीडितेने दिली आहे.

दरम्यान, या महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नव्हती, या महिलेला व तिच्या मुलाला पोलिसांनी सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार नाईकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही तिने केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले होती. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर नाईक यांना त्वरीत अटक करावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT