Thane News: राज्यात दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात महिला कलाकारांच्या काही आक्षेपार्ह डान्स आणि अश्लील हावभाव यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ऐश्वर्या जाधवला परवानगी नाकारली होती. यानंतर आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलही अडचणीत आली आहे.
भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनीही नौपाडा पोलीस ठाण्यात लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.त्यांनी अश्लील हावभाव,बिभत्स डान्स आणि डायलॉगबाजी केल्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेविका पेंडसे यांनी केली आहे.
भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ आणि तक्रार दिली आहे. यावेळी त्यांनी राजकीय म्हणून मी तक्रार करण्यासाठी आलेली नसून एक महिला म्हणून तक्रार करत असल्याचं म्हटलं आहे.
ठाणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार केली दाखल केली आहे. त्यांनी यावेळी कोणताही राजकीय पक्ष असो आम्हाला त्याबाबत काहीही देणे घेणे नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ दाखवला.यात गौतमी दहीहंडीच्या कार्यक्रमात भरस्टेजवरुन अरे डार्लिंग लोक आहात तुम्ही माझे,इकडे मी भाऊ वगैरे मानत नाही बरं का...एक पप्पी देते तुम्हाला...चालतंय का? घ्या तेवढी" असा डायलॉगबाजी करतेय. यावरच मृणाल पेंडसे यांनी आक्षेप घेतला आहे.
त्या म्हणाल्या, एकीकडे आपण समाजातील वाईट प्रवृत्ती ठेचण्याची मागणी करतो,तर दुसरीकडे अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहोत. तसेच अशा नृत्यांगनामुळे सामाजिक जीवनात विकृती वाढत चालली असल्याचा गंभीर आरोपही भाजप नेत्या पेंडसे यांनी केला आहे.
त्यांनी गौतमी पाटीलच नव्हे,तर कार्यक्रमांच्या आयोजकांवरही कायदेशीर कारवाईची कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नृत्यांगना राधा पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर आता आपल्या दिलखेच अदांमुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.