Eknath Shinde news| Asam Congress| 
मुंबई

'निघा आता'; आसाम कॉंग्रेसने शिंदे गटाला फटकारलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेचे (Shvisena) बंंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे. या पूरपरिस्थितीत लाखो लोक बेघर झाले असताना एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये सरबराई सुरु आहे. गुवाहाटीमधील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत.

पण राज्यात पूरपरिस्थिती असताना आसामधील भाजपचे नेतेही एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे त्यांच्या बंडाला पूर्ण मदत करत असल्याचेही समोर आले आहे. भाजपच्या या भूमिकेवरून आसामचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून फटकारले आहे.

हेच पत्र महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊटंवरुन हे पत्र शेअर केलं आहे. '' महाराष्ट्र अडचणीत आणलाच शिंदेजी,आता आसामसुद्धा अडचणीत आणू नका. पूरपीडित लोकांना मदत देण्यापेक्षा आपल्या सरबराई मध्ये आमचं सरकार व्यस्त आहे,हे महाराष्ट्राला शोभत नाही.तुम्ही तुमची घालवली तेवढी इज्जत पुरे आहे. निघा आता.'' असी टिका भूपेन कुमार बोरा यांनी यांनी पत्राद्वारे केली आहे.

तसेच, गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राज्यासाठी हानिकारक असून त्यामुळे आसामची बदनामी होत असल्याचे सांगितलेही त्यांचे म्हटले. राज्याचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर आसाममधून निघून जावे, अशी विनंती बोरा यांनी केली आहे.

आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात आणि त्याचा आदरही करतात. पण महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे. त्यामुळे आमच्या राज्यातून निघू जा, असा थेट इशाराच आसाम कॉंग्रेसने दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार अडचणीत आणलंच आहे, पण आमचेही राज्य नका अडचणीत आणू नका, निघा आता, असा सणसणीत टोला आसामच्या (asam) काँग्रेसने शिंदेना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT