Rahul Shewale Latest Marathi News, Shivsena News, Political News  sarkarnama
मुंबई

खासदार राहुल शेवाळे यांचे 'ते' व्हिडीओ बाहेर काढण्याची धमकी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Shivsena | Rahul Shewale : शेवाळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे हनी ट्रॅपचे प्रकरण ताजे आहे. अशातच आता शिवसेना (Shivsena) खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनीही आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात येत असल्याची तक्रार पोलिस स्थानकात दाखल केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल शेवाळे यांच्याविरोधात तीन महिन्यांपूर्वी एका महिलेने साकीनाका पोलिस स्थानकात बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. मात्र या दोन बातम्याचा काही संबंध आहे की नाही याची खातरजमा 'सरकारनामा'ने केली नाही.

संबंधित तरुणीने शेवाळे यांना अनेकदा पत्र लिहिले असून तिने स्वतः शेवाळे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु शेवाळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही तक्रारीत केला आहे.(Rahul Shewale News Updates)

कोण आहेत राहुल शेवाळे?

राहुल शेवाळे म्हणजे शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांपैकी एक प्रमुख नाव आहे. शिवसेनेत मातोश्रीच्या निकवर्तीय वर्तुळातही शेवाळे यांचे नाव घेतले जाते. अनेक वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या शेवाळे (Rahul Shewale) यांनी पालिका स्तरावरुन शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ते अणुशक्तीनगर येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. २००४ मध्ये त्यांनी तुर्भे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला होता. (Shiv Sena MP Rahul Shewale political journey)

त्यानंतर २०१० ते २०१४ असे ४ वर्ष राहुल शेवाळे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१४ मध्ये मोदी लाटेत ते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्येही राहुल शेवाळे पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. शिवसेनेतील बंडानंतर शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्यानंतर त्यांचे नाव नुकतेच चर्चेत आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT