devendra fadnavis- uddhav thackeray

 
मुंबई

उद्धव ठाकरे बरे होईपर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा कार्यभार द्या

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udddhav Thackeray) यांची प्रकृती ठिक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते घरीच आराम करत आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udddhav Thackeray) यांची प्रकृती ठिक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते घरीच आराम करत आहेत. हिवाळी अधिवेशनालाही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. अशातच आता राज्याचा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार कोण सांभाळणार असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना याबाबत विचारले असता त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवसांचेच नाव घेतले आहे.

रामदास आठवले नेहमीच आपल्या विधानांमुळे आणि कवितांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ''उद्धव ठाकरे आजारी आहेत. अजून त्यांना पुर्णपणे बरे होण्यासाठी २-३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, तर मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं,' असे हास्यास्पद विधान त्यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर, ख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा पदभार इतर नेत्यांकडे देण्याची मागणीही भाजप नेते करत आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून ते घरीच आराम करत आहेत. हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित नसल्याने विरोधी पक्षानेही महाविकास आघाडीला धारेवर धरत आहेत. हे पाहता उद्धव ठाकरे बरे होत नाहीत तोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्याची मागणी आठवलेंनी केली आहे.

तसेच, राज्यात , "महाविकास आघाडीचे सरकार हटवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी, या चंद्रकांत पाटील यांच्या मताशी त्यांनी सहमती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकार मधून शिवसेना बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच भाजप-सेना युतीचे सरकार येईल, असे भाकीतही रामदास आठवलेंनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT