Ranjitsinh Disale guruji news, Solapur News
Ranjitsinh Disale guruji news, Solapur News Sarkarnama
मुंबई

Disale Guruji: ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना दणका : 34 महिन्यांचा पगार होणार वसूल

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले (Global Teacher Ranjit Singh Disle) यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त काल (बुधवारी) समोर आलं आहे. डिसले गुरुजी त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Global Teacher Ranjit Singh Disle latest news)

माढा तालुका (Solapur News) प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे त्यांनी पोस्टाद्वारे आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून तीन वर्षाचा पगार वसुल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कारवाई होण्याअगोदर रणजितसिंह डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे.

8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवर कारवाई करणार आहे. जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला आहे. हा सर्व पगार सोलापूर जिल्हा प्रशासन वसूल करणार आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माहिती दिली आहे.(Solapur latest Marathi News)

डिसले गुरुजींनी अमेरिकेमध्ये पीएचडी करण्यासाठी ३ वर्षांची अध्ययन रजा घेतली होती, मात्र, यासाठीचे आवश्यक कागदपत्र सादर न करता त्यांनी ही राजा मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिसले गुरुजी ८ ऑगस्टला अमेरिकेमध्ये जातं आहेत, त्यांचा व्हिसा आणि फुलब्राईटची त्यांची स्कॉलरशिपची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT