Maharashtra Budget Session  
मुंबई

महिला शेतकऱ्यांसाठी गुड न्युज; कृषी योजनांमध्ये ५० टक्क्यांची राखीव तरतुद

Maharashtra Budget Session | Ajit Pawar | राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या 'विकासाची पंचसूत्री' या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या वतीने २०२१-२०२२ चा आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. गुरुवारी (ता. १०) विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. (Maharashtra Budget Session latest news)

या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढीची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे राज्यातल्या सामान्य माणसाला काय मिळणार, याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे.

शेतकरी महिलांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेल्या ३० टक्क्यांच्या तरतूदीत वाढ करून ५० टक्के इतकी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्यभरातील महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यात गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

येत्या आर्थिक वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ६० कृषी पंपाना वीज पुरवठा केला जाणार आहे. राज्यभरातील प्रत्येक महसूल विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबवण्यात येणार असून या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधीची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येईल. हवेलीत छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येईल. या प्रकल्पांसाठी २५ कोटींचा निधी पुरवला जाईल.

देशातील तरुणांना महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी यासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमधील जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. यासोबतच पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचाही निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT