Gopichand Padalkar Vs Jitendra Awhad sarkarnama
मुंबई

Gopichand Padalkar Insults Jitendra Awhad : 'तुझ्या गां*** किती दम, कुत्री घेऊन फिरत नाही', गोपीचंद पडळकर- जितेंद्र आव्हाड भिडले, जोरदार राडा!

Padalkar Slams Car Door, Awhad Fires Back Clash Outside Vidhan Bhavan: आव्हाड म्हणाले, बाप नसताना मुंबईत 40 वर्ष राजकारण केलंय ते उगच नाही. कार्यकर्त्यांनी लायकी दाखवली काय इज्जत राहिली.

Roshan More

MLAs Padalkar vs Awhad: विधान भवन परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार राडा झाला. गोपींचद पडळकर शिविगाळ करत असलेला व्हिडिओ देखील समोर आला आहे. 'तुझ्या गां****...दम किती आहे बघतो मी. तुझ्या सारखी कुत्री घेऊन मी फिरत नाही. एकटाच आहे मी ये ना.', असे पडळकर बोलताना दिसत आहेत.

विधान भवन परिसरात गोपीचंद पडळकर यांनी गाडीतून उतरताना गाडीचा दरवाजा मुद्दाम जोरदारपणे ढकलला आणि तो मला लागला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. आणि यावरून दोन्ही नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली.

'माणसाला दररोज छळायला लागले तर तोही ऐकत नाही. तुम्ही तुमच्या घरी मोठे मी माझ्या घरी मोठा. विधान भवनाच्या परिसरात माझ्या राजकीय भूमिका टीका करताना अर्बन नक्षल म्हटले मी माझ्या भाषेत उत्तर दिलं. मस्ती करायची नाय.

मस्ती केली तर सहन करायची तयारी ठेवायची.' , असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना लगावला. कार्यकर्त्यांनी रंग दाखवचा तो दाखवलाच ना. काय इज्जत राहिली. बाप नसताना मुंबईत 40 वर्ष राजकारण केलंय ते उगच नाही, असे देखील आव्हाड यांनी म्हटले.

तो नक्षवादी आहे का?

नक्षलच्या बद्दलची मी भूमिका मांडतो होतो त्यामुळे त्याने टेन्शन घेण्याचा कारण नाही. तो नक्षलवादी आहे का? त्यामुळे काय चिंता करू नका. त्याला विचारा काय काय झाले? असे उत्तर या वादावर पडळकर यांनी दिले.

दरम्यान, आव्हाड आणि पडळकर यांच्यामधील वाद मागील काही दिवसांपूर्वीपासून दिसून येत आहे. पवार कुटुंबावर पडळकर यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर विधानभवनाच्या परिसरात नाव न घेता मंगळसूत्र चोर...मंगळसूत्र चोर म्हणून आव्हाड यांनी घोषणा दिल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT