मुंबई

एनसीबीचा अधिकारी भासवण्यासाठी गोसावीने ददलानीला दाखवले 'हे' पुरावे

पण पूजाचा विश्वास संंपादन करण्यासाठी गोसावीने पूजाला काही पुरावे दाखवले होते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील (Aryan Khan case) पुन्हा एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी किरण गोसावीने (Kiran Gosavi) अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) मॅनेजर पूजा ददलानीसोबत (Puja Dadlani) डिल केली होती, हे सर्वांनाच माहित आहे. पण पूजाचा विश्वास संंपादन करण्यासाठी गोसावीने पूजाला काही पुरावे दाखवले होते.

या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीने पुजा ददलानीला आर्यन खान याला यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत स्वत:ची ओळख एनसीबी अधिकारी अशी करून दिली होती. पुजा ददलानीचा विश्वास संपादन करण्यासाठी गोसावीने आपण एनसीबीचा अधिकारी असल्याचे भासवले. त्या बदल्यात आर्यनला बाहेर काढून पैसे उकळण्याचा कट होता.

मुंबई पोलिस हेच कारण पुढे करत किरण गोसावीवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यासाठी पुजा ददलानीचा जबाबही तितकाच महत्वाचा आहे. पुजा ददलानीलाही मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं असून तिने तब्येतीचं कारण देत, पोलिसांकडे वेळ मागितला आहे.

पुजाच्या भेटी दरम्यान, गोसावीने आर्यन सोबतचा सेल्फी, एक ऑडियो क्लिप आणि कार्डिलिया क्रूझवरील एनसीबी अधिकार्यांसोबतचे फोटो पुजाला दाखवल्याचे एका अधिकार्याने सा़ंगितले.या प्रकरणात कुठल्याही अधिकृत एनसीबी अधिकार्याचा यात संबध मुंबई पोलिसांना आढळून आलेला नाही. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरणाशी संबधित प्रत्येक पंचाची पोलिस चौकशी करून त्याचा जबाब नोंदवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT