Bhagatsingh Koshyari
Bhagatsingh Koshyari  Sarkarnama
मुंबई

Bhagatsingh Koshyari : राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारीत; पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

सरकारनामा ब्युरो

Bhagatsingh Koshyari Ready To Resign : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित जीवन चिंतन, मनन कऱण्यात घालवण्या मानस असल्याची इच्छा असून पदातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी या पत्रात नमुद करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या विरोधात नाराजीचा सुरु उमटू लागला होता. शिवप्रेमींकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यांच्याविरोधात राज्यभरातून निदर्शने करण्यात आली. त्यांच्या विरोधातील हे वातावरण काहीसे शांत झालेले असतानाच आता त्यांनीच स्वत:हूनच पंतप्रधानांकडे पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

काय लिहीले आहे, राज्यपालांनी आपल्या पत्रात?

''राज्यपाल कोश्यारी आपल्या पत्रात म्हणतात की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्यासाठी अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” अशा शब्दांत राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहीलेल्या पत्रात भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT