shivajirao garje-aditi nalawade
shivajirao garje-aditi nalawade 
मुंबई

शिवाजीराव गर्जे, आदिती नलावडे यांच्या आमदारकीच्या स्वप्नाला राज्यपालांचा ब्रेक?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त झालेल्या दोन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि मुंबई संघटक अदिती नलावडे यांच्या नावांची शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महिन्यापूर्वी केली असली, तरी राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याने राजकीय वादंगाची शक्‍यता निर्माण झाली आहे

याबाबत राज्यपालांतर्फे विधानपरिषदेवर साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड केली जावी, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितली होती. राज्यपाल सचिवालयाने गलगली यांना कळविले की, मुख्यमंत्री महोदयांकडून प्राप्त शिफारसपत्रावरील निर्णय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात येणार नाही. राज्यपाल नियुक्‍त सदस्यांची नियुक्‍ती मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे केली जाते. मुख्यमंत्र्यांची शिफारस म्हणजे मंत्रिमंडळाचा तो निर्णय असतो आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे राज्यपालांना बंधनकारक असल्याची तरतूद घटनेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT