मुंबई

दूध ओतल्याने ग्राहक पंचायतीने केला राजू शेट्टींचा निषेध

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दूध बंद करण्याचे आंदोलन ग्राहकविरोधी असून त्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांना एसएमएस करून निषेध नोंदवण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतने केली आहे. आज या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात पंचायतचे ऍड. शिरीष देशपांडे यांनी निषेधाचे आवाहन केले आहे.

दुधासारखे नैसर्गिक व पोषक अन्न फेकुन देणे या देशाचे जबाबदार ग्राहक म्हणून आम्हाला अजिबात मान्य नाही. आज या देशात बरीच जनता अर्धपोटी आहे व बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशावेळी दूध ओतून टाकणे, दुधाच्या टॅंकर्सना आगी लावणे व मुंबई सारख्या शहराचे दूध रोखण्याचा विध्वंसक मार्ग अवलंबणार्या आंदोलकांचा व त्यांच्या बेजबाबदार नेत्यांचा आम्ही ग्राहक म्हणून *त्रिवार निषेध* करतो. 

दूध उत्पादक शेतकर्यांना दूधाचा योग्य भाव मिळालाच पाहिजे. परंतु त्यासाठी ग्राहकांना वेठीस धरण्याची गरज नाही. हे आंदोलन अशाच बेजबाबदारपणे चालू राहिले तर आम्ही ग्राहकही ते सहन करणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT