Gram Panchayat Election Sarkarnama
मुंबई

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये छप्परफाड मतदान!

Gram Panchayat Election : नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींचे मतदान पार पडले मतदानाच्या प्रमाणाबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले आहे. यावेळी सदस्य, सरपंचपदासाठीदेखील आज मतदान पार पडले. (Gram Panchayat Election)

निवडणूक जाहीर करताना, राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. यापैकी काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यामुळे आज बिनविरोधात निवडणुका वगळता, प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. यापैकी नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.

या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, या नंतर निकाल जाहीर होण्यास सुरूवात होईल.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.

.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT