<div class="paragraphs"><p>Rajesaheb Mane</p></div>

Rajesaheb Mane

 

Sarkarnama

मुंबई

धक्कादायक : जीएसटीचे सहआयुक्त राजेसाहेब माने बेपत्ता झाल्यानं खळबळ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जीएसटीचे (GST) सह आयुक्त राजेसाहेब माने (Rajesaheb Mane) बुधवारी (ता. 6) दुपारपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माने यांच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा भायखळा पोलीस (Police) ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून माने यांचा शोध घेतला जात आहे.

राजसाहेब माने (वय 55) हे कुटुंबासह कांदिवली येथे राहतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी माझगाव येथील जीएसटी भवनमधील कार्यालयात गेले. दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. पण त्यानंतर ते कार्यालयत परतलेच नाहीत. तसेच रात्री उशिरापर्यंत घरीही आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला.

माने यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही काहीच पत्ता लागत नसल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने माने यांचा शोध सुरू केला आहे. माने यांची छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली आहे. त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, माने यांचा मोबाईल कार्यालयातच आढळून आला आहे. दुपारी मोबाईलवर एक मिटींग झाल्यानंतर त्यांनी कार्यालयातच आपला मोबाईल ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. काही कारणास्तव ते तणावात असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे. ते बेपत्ता होण्याची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT