CM Bhupendra Patel  Sarkarnama
मुंबई

भाजपची काल ममतांवर टीका अन् आज व्हायब्रंट गुजरातसाठी मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो!

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबई दौऱ्यावर आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का?, इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मुंबई दौऱ्यावरून उपस्थित केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आत्मनिर्भर गुजरातच्या प्रचारासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज मुंबईत आले आहेत.

गुजरातमध्ये 10 ते 12 जानेवारीदरम्यान व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुंबईत रोड शो आहे. तसेच ते विविध क्षेत्रातील मान्यवरांशीही संवाद साधत आहेत. भूपेंद्र पटेल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

त्यानुसार पटेल यांनी आज सकाळपासूनच उद्योगपती, विविध कंपन्यांचे अधिकारी यांची भेट घेण्यास सुरूवात केली आहे. पटेल यांनी सकाळी कोटक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक, टाटा कंपनीजचे एन. चंद्रशेखरन आदींची भेट घेतली आहे. पटेल यांनी त्यांचे फोटोही ट्विट केले आहेत.

दरम्यान, बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राऊत यांची भेट घेतली. या भेटीवरुन ठाकरे अन् ममता यांच्यातील बंद दाराआड काय चर्चा झाली, याचा खुसाला करावा, अशी मागणी शेलार यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी एकापाठोपाठ ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ''मा. ममता दिदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय... पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे. त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण... महाराष्ट्रातील उद्योगांना, दिदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का?' असा सवाल शेलार यांनी केला होता.

इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का?, इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच, नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली,यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना?, अशी विचारणा शेलार यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT