Gujarat Election Congress Manifesto
Gujarat Election Congress Manifesto  Sarkarnama
मुंबई

Gujarat Election : काँग्रेस बदलणार नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव..

सरकारनामा ब्युरो

Gujarat Election Congress Manifesto : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सध्या देशभर उत्साहाचे वातावरण आहे. याचा गुजरात निवडणुकीसाठी काय फायदा होणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. काँग्रेस पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. आज (शनिवारी) गुजरात विधानसभा निवडणुकीचा जाहिरनामा कॉंग्रेसने प्रसिद्ध केला आहे.

गृहिणी,विद्यार्थी, शेतकरी, दलित,प्रशासन आदींसाठी कॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात मोठे आश्वासन दिले आहे.10 लाख नोकऱ्यांसह शेतकऱ्यांना कर्जमाफी व 300 यूनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलून सरदार पटेल करण्यात येईल, असेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,'मोदींना केव्हाच सरदार पटेल होता येणार नाही. या निवडणुकीत त्यांना स्वतःची कुवत लक्षात येईल.

काय आहे मेनिफेस्टोमध्ये

  • गृहिणींना अवघ्या 500 रुपयांत स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर

  • पंचायतींचे हिरावून घेण्यात आलेले अधिकार परत केले जातील.

  • भ्रष्टाचार प्रतिबंधक व मनरेगासाचे वेतन वेळोवेळी देण्यास प्राधान्य दिले जाईल.

  • 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी

  • शेततळे बांधण्यासाठी सरकार अनुदान देईल.

  • कालव्यातून शेतापर्यंत मोफत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT