Hardik Patel  Sarkarnama
मुंबई

Gujarat New Cabinet : गुजरातच्या संभाव्य मंत्रिमंडळातून 'या' नेत्याला डच्चू

Gujarat New Cabinet : कनू देसाई, भानू बाबरिया शंभूप्रसाद टुंडिया, मौलू बेरा, दर्शना देशमुख , पीसी बरंजडा यांच्यासह २५ जणांच्या नावाचा समावेश आहे.

सरकारनामा ब्युरो

Gujarat New Cabinet : गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र (Bhupendra Patel) पटेल आज (सोमवारी) शपथ घेणार आहेत. ५६ वर्षीय भूपेंद्र पटेल यांची शनिवारी अहमदाबादमध्ये सर्वांच्या संमतीने भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड करण्यात आली.पटेल आज १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत (Hardik Patel Gujarat New Cabinet news update)

भूपेंद्र पटेल आज पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. गुजरातच्या संभाव्य मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची यादी समोर आली आहे. यात हार्दिक पटेल यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत जितू वाघानी, हर्ष संघवी, किरीट सिंह राणा, कनू देसाई, भानू बाबरिया शंभूप्रसाद टुंडिया, मौलू बेरा, दर्शना देशमुख , पीसी बरंजडा यांच्यासह २५ जणांच्या नावाचा समावेश आहे.

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण ५२.५ टक्के मतं पडली असून काँग्रेस आणि ‘आप’च्या अनेक उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे.

यामध्ये काँग्रेसच्या ४२, तर आम आदमी पक्षाच्या १२८, एआयएमआयएमच्या १३, बसपाच्या १०० आणि समाजवादी पक्षाच्या १७ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, यंदा काँग्रेसला एकूण २७.२८ टक्के, तर ‘आप’ला १२.९२ टक्के मतं मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT